Emblem

निर्मल ग्रामपंचायत वरवली

तालुका - खेड, जिल्हा - रत्नागिरी, महाराष्ट्र

Nirmal Grampanchayat Varvali

Maharashtra-Emblem Azaadi-Ka-Amrut-Mahostav Punyashlok_300_Logo Grampanchayat-Varwali
:

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय तपासणी

दिनांक : १३ मे २०२६

मुख्य प्रतिमा
आज बुधवार दिनांक 13 मे 2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय तपासणी जिल्हा परिषद नाशिक तालुका इगतपुरी येथील गट विकास अधिकारी मा. श्री. महेश वळवी साहेब, मा. श्री. रविंद्र आहिरे सर विस्तार अधिकारी पंचायत, ज्ञानेश्वर कराळे सर विस्तार अधिकारी पंचायत या टीम ने ग्रामपंचायत वरवली, ता. खेड, जि. रत्नागिरी ची गुणांकना नुसार तपासणी केली. यावेळी ग्रामपंचायत प्रशासक सौ. प्राजक्ता दिपक यादव, ग्रामपंचायत सदस्य श्री संतोष यादव, श्री बाळकृष्ण पवार, श्रीमती कमलताई पड्याळ, सौ.स्वप्नाली यादव, सौ. वैशाली जाधव तसेच ग्रामपंचायत अधिकारी विजय निकम, सोमजाई ग्राम संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सी आर पी, सौ अंजली यादव, ग्रामपंचायत अधिकारी युनियन खेडचे अध्यक्ष श्री. रोहन क्षीरसागर व सदस्य , अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, जिल्हा परिषद केंद्र शाळा वरवली चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अमित सावंत सर, मुख्याध्यापक श्री भागोजी कडव सर तसेच इतर शिक्षक वृंद, आरोग्य सेवक सेविका व आरोग्य कर्मचारी, बचत गटाचे तालुकास्तरीय अधिकारी श्री मर्चंडे साहेब व श्रीमती रूपाली कोळंबे मॅडम, वरवली गावचे महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री अनिल यादव, वरवली गावचे पोलीस पाटील श्री गणेश आखाडे तसेच बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. त्यावेळी ग्रामपंचायत वरवली ने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कालावधीत केलेल्या कामांचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.